संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे स्मारक Samyukta Maharashtra movement Memorial Mumbai

संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन, शिवाजीपार्क, दादर,मुंबई


दादरला गेलो असता आज अनपेक्षितपणे हे स्मारक समोर आले. मला याबद्दल माहिती नव्हती आणि इतर कोणाकडूनही कधी ऐकलं नव्हतं. पण अतिशय माहितीपूर्ण आणि देखणे स्मारक आहे. 
मुंबईकरांसाठी, मुंबईला येणाऱ्या पर्यटकांसाठी "भेट दिलीच पाहिजे" असं ठिकाण आहे हे. तसं ते बिंबवण्यासाठी या स्थळाची माहिती लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे. म्हणून अवश्य शेअर करा.

लढ्यातील महत्त्वाच्या क्षणांची तैलचित्रे, रेखाचित्रे आणि जुनी छायाचित्रे  स्मारकात आहेत. लढ्याच्या प्रमुख शिलेदारांची व्यक्तिचित्रे असणारं स्वतंत्र दालन सुद्धा आहे. स्मारकाचे काही फोटो एका ठिकाणी उपलब्ध व्हावेत आणि तुम्हालाही शेअर करायला सोपे जावे म्हणून ब्लाॅगपोस्ट बनवली आहे. 
ही लिंक शेअर करा.


स्मारकाच्या बाहेरील शिल्प

देखणे माहिती दालन. संयुक्त महाराष्ट्राची मागणी सुरू झाली (टिळक काळापासून) तिथपासून महाराष्ट्र राज्य निर्मितीपर्यांतचा प्रवास, आंदोलनातले चढ उतार, महत्त्वाचे टप्पे समजावून सांगितिले आहेत.




संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न दाखवणारा नकाशा.

लढ्याचे, मोर्चाचे, हुतात्म्यांचे फोटो.

बाळासाहेबांचे व्यंगचित्रातून फटकारे; "मावळा" या टोपण नावाने.



व्यक्तिचित्रांचे दालन . प्रमुख पंचवीसेक शिलेदारार-नेत्यांची तैलचित्रे आणि थोडक्यात माहिती आहे.



उदा. लढ्यातील रणरागिणी



राज्य निर्मितीच्या सोहळ्याची रेखाचित्रे


"यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला" असा जो वाक्प्रचार आहे त्यातले हे मंगलकलश
राज्य निर्मिती सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे पाणी आणले तो मंगलकलश

सर्व जिल्ह्यांतून पवित्र माती आणली तो मंगलकलश


महाराष्ट्र राज्य निर्मिती च्या निमित पोस्टाने २मे १९६० मुंब‍ईला येणार्‍या जाणार्‍या पत्रांवर विशेष शिक्का मारला होता.




लढ्याशी संबंधित कवितांची सुंदर भित्तीशिल्पे आहेत. त्यातील एक.

महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा जपणारी वासुदेव, धनगर, गोंधळी, कीर्तनकार आदींची शिल्पे महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देताना दिसतात.


स्मारकाचे ठिकाण. गूगल मॅप लोकेशन 




स्मारकाबद्दल
शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून या संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाला प्रत्यक्षात साकारण्यात आले आहे.स्मृतिदालनाचे उद्घाटन 2010 मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
अशा या सुंदर स्मारकाला नक्की भेट द्या. इतरांना सांगा. त्यासाठी ही लिंक शेअर करा.


Comments