भीम अ‍ॅप कसे वापरावे ? सोपी प्रक्रिया समजून घ्या मराठीतून Marathi Instructions to use BHIM app

कॅशलेस इंडिया - रोकडविरहित भारतासाठी भारत सरकारने काल (३० डिसें) रोजी नवीन "भीम" अ‍ॅप सुरू केलं आहे. यूपिआय अ‍ॅपचीच ही सुधारित आवृत्ती आहे आणि वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे, क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत. पूर्वी प्रत्येक बँकेचं स्वतःचं यूपिआय अ‍ॅप होतं. आता सगळे जण एकच अ‍ॅप वापरू लागले की त्यातल्या त्रुटी लवकर लक्षात येतील, लवकर सोडवल्याही जातील आणि अधिकाधिक सोयी टाकल्या जातील अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.
माझ्या मोबाईल वर अ‍ॅंड्रॉईड ६.०.१ आहे आणि त्यात ते यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आणि काम करत आहे.  


या ब्लॉगपोस्ट मध्ये आपण पुढील गोष्टी बघणार आहोत
भीम अ‍ॅप इन्स्टॉल आणि सेटिंग करणे (हे एकदाच करायचं ) आहे.
एमपिन सेट करण्यासाठी
एमपिन रिसेट करण्यासाठी
एमपिन बदलण्यासाठी
भीम अ‍ॅप वापरून पैसे देण्यासाठी
तुमचा क्यूआर कोड असा मिळवा
पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईल नंबर ऐवजी क्यूआर कोड कसा वापरायचा
पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईल नंबर ऐवजी यूपिआय अ‍ॅड्रेस (व्हीपीए VPA) कसा वापरायचा


भीम अ‍ॅप इन्स्टॉल आणि सेटिंग करणे
या दिलेल्या स्टेप्स वाचताना खूप मोठ्या वाटल्या तरी प्रत्यक्षात खूप पटकन ५ मिनिटात होतात.
1) गूगल प्ले स्टोर वर  in.org.npci.upiapp शोधा. खाली लाल चौकोनात दाखवले आहे ते अ‍ॅप दिसेल ते इन्स्टॉल करा





2) इन्स्टॉल झालं की अ‍ॅप उघडा.  भाषा निवडायचा पर्याय येईल. सध्या इंग्रजी आणि हिंदी चे पर्याय उपलब्ध आहेत. इतर भाषा नंतर उपलब्ध होणार आहेत. मी इथे इंग्रजी निवडली आहे.




3) पुढे अ‍ॅप बद्दल माहिती देणाऱ्या स्क्रीन दिसतील. त्याच्यावर "नेक्स्ट" करा


4) पुढच्या स्क्रीनवर एसएमएस पाठवण्याची परवानगी मागण्यात येईल. त्यावर "लेट्स गेट स्टार्टेड" (Let's get started) वर क्लिक करा. 


5) या अ‍ॅपला तुमच्या मोबाईलवरून एसएमएस पाठवायची आणि फोन कॉल करायची परवानगी मागण्यात येईल. ती द्या. अलाउ (Allow) वर क्लिक करून


6) काही समस्या असेल तर अश्या वेळी पुढची स्क्रीन दिसेल. "ट्राय अगेन" (Try again) वर क्लिक करा 

7) पुढच्या स्क्रीन वर मोबाईल सिम निवडण्याचा पर्याय येईल. दुहेरी सिम वापरणाऱ्या मोबाईल साठी हा पर्याय उपयोगाचा आहे. जर मोबाईल मध्ये एकच सिम असेल तर ते दिसेल

8) आपोआप एसएमएस पाठवला जाईल आणि "मोबाईल व्हेरिफिकेशन सक्सेसफुल" दिसून पुढची स्क्रीन येईल.त्या स्क्रीनवर ४आकडी पिन, अर्थात या अ‍ॅपचा पासवर्ड ठरवा आणि टाका. 
9) या पासवर्डची पुष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा पासवर्ड विचारला जाईल. तोच पुन्हा टाका
10) मोबाईल व्हेरिफाईड दिसेल.

11) आता तुमची बॅंक निवडा. हा मोबाईल नंबर ज्या खात्याशी संलग्न असेल ती बँक निवडा
12) तुमचा खाते क्रमांक दिसेल त्यावर क्लिक करून तो निवडा

13) जर तुम्ही आधी दुसरे यूपिआय वापरून "एमपिन" सेट केला असेल तर तुम्हाला अजून काही करायची गरज नाही. अन्यथा तुम्हाला डेबिट कार्ड चे तपशील वापरून एमपिन बनवता येईल. त्यासाठी "एमपिन सेट करणे" ची कृती बघा. त्यासाठी येथे क्लिक करा

14) "एमपिन" सेट झाले की स्क्रीन अशी दिसेल 



आता तुमचे अकाउंट वापरासाठी तयार आहे !!



एमपिन सेट करणे
अ‍ॅप इन्स्टॉल करताना जर एमपिन सेट नसेल तर तुम्हाला डेबिट कार्डचि माहिती विचारणारी स्क्रीन दिसेल. तुमच्य कडे डेबिट कार्ड जवळ नसेल तर तुम्ही नंतर एमपिन सेट करू शकता. 

1) त्यासाठी अ‍ॅप उघडा. "बॅंक अकाउंट" वर क्लिक करा.
 2) तुम्हाला खात्याचे तपशील आणि "सेट यूपिआय पिन" असे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.

3) पुढे दिसलेल्या स्क्रीनवर डेबिट कार्डचे शेवटचे सहा आकडे आणि वैधता समाप्ती (महिना-वर्ष) टाका.



4) तुम्हाला वन टाईम पासवर्ड (ओटीपी/ OTP ) चा एसेमेस येईल.हा ओटीपी पुढच्या स्क्रीनवर अपोअप घेतला जाईल. आपोआप घेतला गेला नाही तर एसएमेस मधला ओटीपी टाका. तुम्हाला जो एमपिन ठेवायचा आहे तो "सेट यूपिआय पिन" म्हटलं आहे तिथे टाका.
आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा.




15) पुढच्या स्क्रीन वर आपोआप जाल. नव्या पिन ची पुष्टी करण्यासाठी जिथे "कन्फर्म पिन" म्हटले आहे तिथे नवा पिन पुन्हा एकदा टाका.आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा

16) तुमचा यूपिआय पिन सेट होईल आणि तुम्ही पुन्हा मुख्य पनावर याल


एमपिन रिसेट करण्यासाठी


जर तुम्ही आधी सेट केलेला "एमपिन" विसरला असाल तर पुढील कृती करा


1) खाली दाखवलेल्या "बॅंक अकाउंट" पर्यायावर क्लिक करा.


2) पुढे रिसेट पिन (Reset  PIN) वर क्लिक करा


3) तुमच्या डेबिट कार्ड चे तपशील द्या.आणि बरोबर च्या चिन्हावर क्लिक करा.

4) पुढील सर्व कृती एमपिन सेट करण्या सारखीच आहे. 

तुम्हाला वन टाईम पासवर्ड (ओटीपी/ OTP ) चा एसेमेस येईल.हा ओटीपी पुढच्या स्क्रीनवर अपोअप घेतला जाईल. आपोआप घेतला गेला नाही तर एसएमेस मधला ओटीपी टाका. तुम्हाला जो एमपिन ठेवायचा आहे तो "सेट यूपिआय पिन" म्हटलं आहे तिथे टाका.आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा.




5) पुढच्या स्क्रीन वर आपोआप जाल. नव्या पिन ची पुष्टी करण्यासाठी जिथे "कन्फर्म पिन" म्हटले आहे तिथे नवा पिन पुन्हा एकदा टाका.आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा

6) तुमचा यूपिआय पिन सेट होईल आणि तुम्ही पुन्हा मुख्य पनावर याल



एमपिन बदलण्यासाठी
जर तुम्हाला सध्याचा एमपिन माहिती असेल आणि तो बदलायचा असेल तर 

1) खाली दाखवलेल्या "बॅंक अकाउंट" पर्यायावर क्लिक करा.


2) चेंज "यूपिआय पिन" (Change UPI PIN) वर क्लिक करा

3) एंटर पिन म्हटले आहे तिथे सध्याचा पिन टाका आणि सेट पिन म्हटले आहे तिथे नवीन पिन टाका

4) पुढच्या स्क्रीन वर आपोआप जाल. नव्या पिन ची पुष्टी करण्यासाठी जिथे "कन्फर्म पिन" म्हटले आहे तिथे नवा पिन पुन्हा एकदा टाका आणि बरोबरच्या चिन्हावर क्लिक करा.




आपला एमपिन यशवीरित्या बदलला गेला तर तसा संदेश स्क्रीनवर दिसेल.
सध्या अजून हा प्रकार नीट चालू झालेला दिसत नाहिये. मी प्रयत्न केला असता पिन बदलता आला नाही.




"भीम अ‍ॅप वापरून पैसे देण्यासाठी

1) अ‍ॅप उघडा. सेंड (send) वर क्लिक करा.


2) पुढच्या स्क्रीनवर मोबाईल नंबर किंवा पेमेन्ट अ‍ॅड्रेस टाका 
उदा. १२३४५६७८९ ला पैसे पाठवायचे असतील तर 123456789 टाका. खाली आलेल्या व्हेरिफाय (verify) बटनावर क्लिक करा

3) पुढे तो मोबाइल नंबर योग्य यूपिआय अ‍ॅड्रेस असेल तर यशस्वीरित्या व्हेरिफाय होईल आणि त्या खातेदाराचे नाव दिसेल.

4) आता रक्कम टाका. व्यवहाराबद्दल रिमार्क मध्ये नोंद करू शकता. आणि पग "पे"(Pay)  वर क्लिक करा

5) "एमपिन" टाका आणि बरोबर च्या चिन्हावर क्लिक करा



5) लगेच पैसे पाठवले जातील आणि त्याची पुष्टी पुढच्या स्क्रीनवर दिसेल

अश्याप्रकारे अतिशय साध्या सोप्या प्रकारे तुमचा व्यवहार पूर्ण झाला आहे !!

तुमचा क्यूआर कोड असा मिळवा 

पेटीएम वापरताना आपण दुकानात  क्यूआर कोड बघितला असेल.  या अ‍ॅप मध्येही आपण आपला क्यूआर कोड असा मिळवू शकाल.

1) अ‍ॅप उघडा आणि प्रोफाईल वर क्लिक करा

2) पुढच्या स्क्रीनवर मोबाईल नंबर असणारा यूपिए अ‍ॅड्रेस आणि क्यूआर कोड दिसेल. डाऊनलोड वर क्लिक करून आपण तो मोबाईल वर डऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट घेऊन आपल्या दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी लावून शकता. शेअर वर क्लिक करून व्हॉटसप, ईमेल वगैरे वर पाठवू शकता


पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईल नंबर ऐवजी क्यूआर कोड कसा वापरायचा 
1) अ‍ॅप उघडा आणि "स्कॅन अ‍ॅंड पे"(Scan & Pay)  वर क्लिक करा

2) आपोआप कॅमेरा सुरू होईल. मोबाईल समोर क्यूआर कोड धरा.

3)  क्यूआर कोड स्कॅन झाला की आपोआप मोबाइल नंअर असणारा यूपिआय अ‍ॅड्रेस दिसेल. 
4) पुढे तो मोबाइल नंबर योग्य यूपिआय अ‍ॅड्रेस असेल तर यशस्वीरित्या व्हेरिफाय होईल आणि त्या खातेदाराचे नाव दिसेल.

5) रक्कम आणि टिप्पणी टाका. "पे" वर क्लिक करा.


6) लगेच पैसे पाठवले जातील आणि त्याची पुष्टी पुढच्या स्क्रीनवर दिसेल.



पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईल नंबर ऐवजी यूपिआय अ‍ॅड्रेस (व्हीपीए VPA) कसा वापरायचा

यूपिआय अ‍ॅड्रेस (व्हीपीए) वापरून पैसे पाठवण्याची पद्धत वर दाखवलेल्या प्रमाणेच आहे (ती कृती बघण्यासाठी येथे क्लिक करा). फक्त मोबाईल नंबर ऐवजी यूपिआय अ‍ॅड्रेस (व्हीपीए) टाकायचा व खाली आलेल्या व्हेरिफाय (verify) बटनावर क्लिक करा.


 जर तो वैध व्हीपीए असेल तर नंतरच्या स्क्रीनावर रक्कम टाका. मग एमपिन विचारल्यवर तो टाका. व्यवहार पूर्ण होईल.

Comments

  1. Xiaomi Redmi note 4g device,device binding failed,not able to proceed.

    ReplyDelete
    Replies
    1. I got app updates today. and from that onwards it has stopped working. i am getting same error.

      Delete
    2. but try again after some time. last night i was getting error. today morning it worked very smoothly.

      Delete
    3. OK thank kaushik

      Delete
  2. Really nice presentation sir.
    Thanks.

    ReplyDelete

Post a Comment