यूपिआय अ‍ॅप कसे वापरावे. Marathi Instructions to use UPI app

कॅशलेस इंडिया - रोकडविरहित व्यवहारांची सध्या खूप चर्चा चालू आहे. वेगवेगळी मोबईल वॉलेट्स प्रचलित होत आहेत. त्यापैकी थेट बॅंकांशी जोडलेला, शासकीय मान्यता असलेला पर्याय म्हणजे यूपिआय (UPI).
यूपिआय अ‍ॅप हे वापरायला अतिशय सोपं आहे. जेव्हा याची सुलभता लक्षात येईल तेव्हा याचा वापर खूप वाढेल. पण यूपिआय कसं वापरायचं या बद्दल कमी माहिती आहे; विशेषतः मराठीत.. म्हणुनच इथे मी सोप्या शब्दात सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपणही ही सोपी कृती वापरून हे अ‍ॅप वापरायला सुरुवात करू शकाल..

तुम्हाला ही ब्लॉगपोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा आहे तेही जरूर सांगा.
------------------------------------------------------------------------------------------
यूपिआय आणि मोबाईल वॉलेट मधील फरक
पेटीएम किंवा इतर मोबाईल वॉलेट मध्ये बँक अकाउंट मधून पैसे भरले जातात - आपण आपल्या पाकिटत ठेवतो तसं. आणि त्यातले पैसे संपले की पुन्हा बँक अकाउंट मधून भरायला लागतात. जर आपल्या मोबाईल वॉलेट मध्ये पैसे जास्त जमा झाले असतील तर ते बँक अकाउंट मध्ये टाकावे लागतात. अर्थात बॅंक ते पेटीएम आणि पेटीएम ते बॅंक अशी कृती करावी लागते. हे पुन्हा पुन्हा करत रहावं लागतं. यूपिआय मध्ये मात्र थेट बँकेच्या खात्यातूनच पैसे जातात आणि आपल्याला आलेले पैसे थेट खात्यतच येतात. त्यामुळे खात्यातून रक्कम काढून मोबाईल वॉलेट मध्ये ठेवाण्याची भानगड नाही. वॉलेट मध्ये पैसे पडून राहिले तर त्याचं व्याज मिळणार नाही. यूपिअय मध्ये हा तोटा आणि जादा कृती नाही.


यूपिआय आणि ऑनलाईन पैसे देणे यातील फरक
ऑनलाईन पैसे देताना आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड, अकाउंट टाईप इ. गोष्टी माहीत असाव्या लागतात आणि त्यात एखाद्या अंकाची चूक झाल्यास भलत्याच्या खात्यात पैसे जाण्याची शक्यता असते. यूपिआय मध्ये मात्र व्यक्तीचा ईमेल आयडी प्रमाणे असणारा व्हीपीए द्ययचा आहे उदा. kaushikTestLele@pnb. खाते क्रमांक, कोड वगैरे टाकण्यपेक्षा हे सोप्पं आणि कमी चुका होतील असं आहे. विशेष म्हणजे यातील व्यवहार लगेच पूर्ण होतो.


------------------------------------------------------------------------------------------
या सेवेचा लाभ घेण्याची सुरुवात करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत.


  1. स्मार्ट फोन
  2. फोनला इंटरनेट / डेटा सर्विस चालू हवी.
  3. जो मोबाईल वापरत आहात त्याचा नंबर बँक खात्याशी जोडलेला असायला हवा. 
  4. त्या खात्याशी संलग्न वैध डेबिट कार्ड


------------------------------------------------------------------------------------------
मी पंजाब नॅशनल बॅंकेचे यूपीआय अ‍ॅप द्वारे ही सेवा कशी वापरायची हे दाखवतो आहे. दाखवतो आहे. पण हेच अ‍ॅप वापरून तुमच्या मोबाईल नंबरशी संलग्न इतर बॅंकांची खातीही जोडू व वापरू शकता.
------------------------------------------------------------------------------------------

या लेखात आपण दोन गोष्टी बघणार आहोत



------------------------------------------------------------------------------------------

व्हर्चुअल अ‍ॅड्रेस तयार करणे

1) प्ले स्टोअर मधून PNB UPI अ‍ॅप डऊलनोड करा आणि इन्स्टॉल करा.



2) अ‍ॅप उघडून "क्लिक मी (Click Me)" बटणावर क्लिक करा



3) मोबाईल मधून आपोआप एक एसेमेस बॅंकेला जाईल (तुमच्या प्लॅनप्रमाणे एसएमएस चार्ज लागेल).
तुमचा हा मोबाईल नंबर बॅंक खात्याशी संलग्न/जोडलेला असला पाहिजे.





4) त्यानंतर अ‍ॅपचा पासवर्ड सेट करा. ( या वेळचे स्क्रीनशॉट माझे घ्यायचे राहिले. जर कोणी हे वाचून ट्राय केलं तर कृपया स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवा. मी इथे अ‍ॅड करीन )

5) पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हे अ‍ॅप वापराल तेव्हा तुम्हाला लॉगिन करताना पासवर्ड विचारला जाईल.

6) योग्य पासवर्ड टाकल्यावर मुख्य स्क्रीन अशी दिसेल




7) आता आपण खाते जोडूया. त्यासाठी "Add Bank a/c" वर क्लिक करा.

8) आपली बॅंक निवडण्याचा पर्याय येईल. बँकेचे नाव टाकून योग्य पर्याय निवडा.




9) पुढे खाते निवडण्याचा पर्याय येईल. तुम्ही जो मोबाईल वापरत आहात तो ज्या खात्याशी जोडलेला असेल त्याची यादी ड्रॉप डाऊन मध्ये येईल. त्यातले योग्य खाते निवडा.






10) पुढच्या स्क्रीनवर व्हर्चुअल अ‍ॅड्रेस ठरवायचा आहे. खालील चित्रात लाल चौकोनाने जी जागा दाखवली आहे तिथे तो भरायचा आहे. बाकीची माहिती (तारीख, अमाऊंट लिमिट वगैरे) बदलण्याची गरज नाही

व्हर्चुअल अ‍ॅड्रेस आपल्या ईमेल आयडी प्रमाणे एक अ‍ॅड्रेस/आयडी  आहे. आपल्या आवडीनिवडी प्रमाणे आपण तो ठरवू शकतो. उदा. नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती टाकेल narendramodi किंवा narendra.modi किंवा namo  किंवा namo123 इ.

"@pnb"  हा भाग टाकायची गरज नाही. तो आपोआप तिथे दिसेल.
जर तुम्ही दिलेला भाग namo123 असेल  तर तुमचा पूर्ण व्हर्चुअल अ‍ॅड्रेस होईल namo123@pnb







11) माहिती भरून सबमिट करा. तुमचा अ‍ॅड्रेस तयार होईल आणि पुढच्या पॉपअपमध्ये तसा संदेश दिसेल. आता त्याचा "यूपिआय पिन" सेट करायचा आहे. म्हणून त्या पॉपअपवर "येस" म्हणा.




12) पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला तुम्ही जोडलेले अकाउंट दिसेल त्यावर क्लिक करा.

13) पुढच्या स्क्रीनवर डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि संपायची तारीख भरून सबमिट करा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या कार्डवर मिळतील .
उदा.




14) पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला  एमपिन (MPIN ) विचारला जाईल. हा तुमच्या खात्याशी संलग्न आहे. तुमच्या बँकेच्या संकेतस्थळावरून तो जनरेट करता येईल.

उदा. ICICI बॅंकेचा एमपिन या संकेतस्थळावरून करता येउ शकतो


त्याचवेळी तुमच्या मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड (One Time Password) अर्थात ओटीपी  (OTP) चा एसएमएस येईल. त्यातला ओटीपी भरा आणि सबमिट करा


15) पिन यशस्वीरीत्या तयार झाल्याचा संदेश येईल.




तुमचा व्हर्चुअल अ‍ॅड्रेस बवण्याचं काम इथे पूर्ण झालं आता तुम्ही कोणालाही त्याच्या व्हर्चुअल अ‍ॅड्रेस वर पैसे पाठवू शकता. ते कसे. हे पुढे बघूया.


व्हर्चुअल अ‍ॅड्रेस वर पैसे पाठवणे

1) अ‍ॅपच्या मुख्य मेनू मध्ये पिवळ्या चौकोनाने दाखवले आहे त्याप्रमाणे "पे" चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


2) एकाच अ‍ॅपवर तुम्ही एका पेक्षा जास्त खाती नोंदवलेली असू शकतील. त्यातील ज्या खात्यातून पैसे पाठवायचे ते योग्य खाते निवडा.

3) त्या खात्याशी संलग्न तुमचा व्हर्चुअल अ‍ॅड्रेस निवडा.


4) पेयी अ‍ॅड्रेस टाईप (Payee address Type) मध्ये व्हर्चुअल अ‍ॅड्रेस (Virtual Address) चा पर्याय निवडा.


5)  ज्याला पैसे द्यायचे त्याचा व्हर्चुअल अ‍ॅड्रेस टाका.
उदा. तुम्ही मला पैसे देणार असाल आणि माझा व्हर्चुअल अ‍ॅड्रेस  kaukaulelelele111@pnb  असेल तर तो टाका. रक्कम टाका.
तुम्ही हा व्यवहार कशासाठी करत आहात ते नमूद करायचं असेल तर "रिमार्क्स" मध्ये ते लिहा.
आणि सबमिट करा.




6) पुढच्या स्क्रीनवर या व्यवहाराचा सारांश दिसेल. सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्या. योग्य नसल्यास मागील स्क्रीनवर जाऊन तपशील बदलून पुन्हा समबिट करा.
सारांश  तपशील योग्य असल्यास "कन्फर्म" वर क्लिक करा.


7) एमपिन टाका. ( हा व्हर्चुअल अ‍ॅड्रेस बनवतानाच तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर एमपिन ठरवला असणार. तो लक्षात असला पाहिजे. अन्यथा बदलून घ्या आणि मग हा व्यवहार करा. )
सबमिट करा.




8) व्यवहार पूर्ण झाल्याचा पॉप-अप येईल. तुमच्या बँकेचा आणि या यूपिआय सिस्टिमचा एसएमएस देखील तुम्हाला येईल.





पैसे पाठवणं आता इतकं सोपं आहे !!


तुम्हाला ही ब्लॉगपोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा आहे तेही जरूर सांगा.

धन्यवाद,
कौशिक लेले

Comments

  1. shriram......
    good job thodi kichkat pan ok .
    Thanks a lot for all of us .

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you. Yea set up ia bit "kichkat" but it's one time process.
      Once done, payment ia quick.

      Thanks for comment.

      Delete
  2. माहिती फारच चांगली सोप्या पद्धतीने दिली आहे.

    ReplyDelete
  3. फोटो दिल्यामुळे कळायला सोपे जाते आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाइकांशी ब्लॉगची लिंक शेअर करू शकाल का? जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती होईल.

      धन्यवाद,
      कौशिक लेले

      Delete
  4. I have four accounts in four different banks. Can all of them have same virtual address & mpin ? Can I transfer funds between my accounts using UPI ?

    ReplyDelete
    Replies
    1. Different VPA for different account.

      Yes u can transfer between your accounts

      Delete
  5. Can I transfer money from my savings account to home Loan account using UPI ?

    ReplyDelete
  6. छान माहिती. ICICI च्या imobile अपमध्ये UPI चि सोय आहे . ते जास्त सुरक्षित आहे.

    ReplyDelete

Post a Comment